आमच्याविषयी

01.

आमच्या बद्दल अधिक माहिती

क्षितिज करिअर अकॅडमी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना योग्य करीअर घडवण्यासाठी मार्गदर्शन देणारी अकॅडमी आहे. तसेच आमच्या इथे लेखी व ग्राउंडची योग्य पद्धतीने तयारी करून घेतली जाते.क्षितिज करिअर अकॅडमी मध्ये सरळ सेवा परीक्षेची योग्य आणि विस्तृत पद्धतीने तयारी करून घेतली जाते.

आमचे कोर्सेस खालील प्रमाणे : 
पोलीस भरती
तलाठी भरती
वनरक्षक भरती
आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल)
आर्मी भरती
रेल्वे भरती
जेल पोलीस
एसएससी भरती
जिल्हा परिषद भरती
लिपिक
सरळ सेवा
राज्य उत्पादक शुल्क

आमचा उद्देश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे.आणि त्यांना यशापर्यंत घेऊन जाणे.

01.

02.

02.

आमच्याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे का ?

क्षितिज करिअर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्ड चा वापर करून आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादी कठीण संकल्पना समजण्यास सोपे जाते.डिजिटल बोर्डवर सादर केलेली माहिती अधिक सखोल आणि स्पष्ट असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनाची क्षमता वाढते.वेळेची बचत होते.शिकवण्याची सामग्री पूर्व-तयार करून ठेवता येते आणि सहजतेने सादर करता येते.

तसेच क्षितिज करिअर अकॅडमी मध्ये एअर कंडिशन लेक्चर हॉल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना विद्यार्थांना सोईस्कर आणि आरामदायी वातावरण मिळते.

आमच्या अकॅडमी मध्ये विविध सरकारी परीक्षांची तयारी करून घेतली जाते. योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आम्ही करतो. आतापर्यंत आमचे विद्यार्थी तलाठी भरती, बीएमसी, लिपिक, पोलीस भरती, आर्मी भरती, जेल पोलीस, जिल्हा परिषद, तसेच महानगरपालिकेच्या विविध पदांवरती कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.

क्षितिज करिअर अकॅडमी मध्ये सर्व सरकारी परीक्षांची तयारी एकाच विशिष्ट फीज मध्ये करून घेतली जाते. जेणेकरून सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांना सोयीस्कर पद्धतीने भरता येईल. आमचा दृष्टिकोन असा आहे की सामान्य विद्यार्थ्याला देखील एखादा क्लास लावताना खर्चाची चिंता न करता विविध परीक्षांची तयारी करता येईल. हा विचार करूनच फी सर्व कोर्सेससाठी माफक ठेवली आहे.

आमच्या अकॅडमी मध्ये प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने दिले जाते. ७ किंवा अधिक वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना त्याच्या व्यापक ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा होतो.

तसेच जवळच मैदान असल्याने विद्यार्थ्यांना मैदानी तयारी करण्यासाठी कोणतीही गैरसोय होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि शारीरिक प्रशिक्षण सुविधांचा सोयीस्करपणे वापर करता येतो. तसेच मैदानालगतच लेक्चर हॉल असल्याने विद्यार्थ्यांना आरामदायी प्रशिक्षण घेता येते. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या उद्देशानेच ग्राउंड शेजारीच लेक्चर हॉल ठेवला आहे .

03.

सर्व सुविधांबद्दल जाणून घ्यायचे आहे का ?

क्षितिज करिअर अकॅडमीच्या परिसरामध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित जागा ठेवली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना पार्किंगची समस्या जाणवत नाही.

आमच्या अकॅडमी मध्ये लायब्ररीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य आणि विविध पुस्तके ठेवली आहेत. लायब्ररी मुळे विद्यार्थ्याना अभ्यासासाठी योग्य आणि पोषक वातावरण मिळते. लायब्ररीत विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करतात .

क्षितिज करिअर अकॅडमी मध्ये तीन हप्त्यांमध्ये फी भरण्याची सुविधा आहे. त्यामूळे विद्यार्थ्याना आपल्या सोयी नुसार फी भरता येते. तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो. फी भरताना पालकांवर कोणत्याही प्रकारचे दडपण राहत नाही.

क्षितिज करिअर अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांच्या मैदानी प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी मैदानी चाचणी घेतली जाते. या व्यतिरिक्त, त्यांच्या शैक्षणिक विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी दर आठवड्याला लेखी परीक्षा घेतली जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटी, एक प्रगती कार्ड तयार केले जाते ,आणि पालकांना पाठवले जाते, त्यांना त्यांच्या मुलाच्या मैदानी आणि लेखी प्रगतीबद्दल माहिती दिली जाते. या नियमित फीडबॅक मुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या प्रगतीबद्दल माहिती मिळते. त्यामुळे पालकांचा आमच्या अकॅडमी वर विश्वास निर्माण झाला आहे.

क्षितिज करिअर अ‍ॅकॅडमीमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्याच्या रिपोर्ट कार्डचे बारकाईने विश्लेषण केले जाते आणि वैयक्तिक लक्ष दिले जाते. तसेच प्रशिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याचे चांगले गुण आणि कमकुवतपणा समजून घेण्यास मदत होते, त्यांना त्यानुसार मार्गदर्शन करतो. ज्या मधे विद्यार्थी कमकुवत आहे, असं दिसल्यास त्याच्यावर जास्त लक्ष देऊन त्याच्यातील न्यूनगंड काढून टाकला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजांवर लक्ष केंद्रित करून योग्य दिशा देण्याचे काम अकॅडमी मार्फत केले जाते. आणि चांगला विद्यार्थी घडवण्याचे काम आम्ही करत असतो.

04

04

परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

परीक्षेच्या तयारीसाठी क्षितिज करिअर अकॅडमी मध्ये प्रवेश ज्या दिवशी घेतला जातो, तेव्हाच त्यांना भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली जाते. कागदपत्रांची योग्य माहिती दिल्याने विद्यार्थ्याना कागदपत्रे तयार करून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे आवश्यक लागणारी महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्याना कोणत्याही संभाव्य अडचणी येत नाही.
सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे:

1. ओळखपत्र :
– आधार कार्ड
– मतदार ओळखपत्र
– पॅन कार्ड
– पासपोर्ट
– वाहन चालविण्याचा परवाना

2. शैक्षणिक प्रमाणपत्रे :
– दहावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
– बारावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
– पदवीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
– पदव्युत्तर शिक्षणाचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

3. जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) :
– अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्ग प्रमाणपत्र
– इतर मागासवर्गासाठी नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र

4. मूळ प्रमाणपत्र :
– राज्याचे मूळ प्रमाणपत्र

5. पासपोर्ट आकाराचे फोटो :
– अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो

6. स्वाक्षरी :
– स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत (परीक्षेच्या आवश्यकतेनुसार)

7. पत्त्याचा पुरावा :
– रेशन कार्ड
– वीज बिल
– बँक पासबुक

8. अपंगत्व प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) :
– मान्यताप्राप्त वैद्यकीय प्राधिकरणाचे प्रमाणपत्र

9. उत्पन्न प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) :
– कोणतीही फी सवलत मिळविण्यासाठी

ही एक साधारण यादी आहे; विशिष्ट परीक्षांसाठी अधिक किंवा कमी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. प्रत्येक परीक्षेच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या अचूक तपशीलांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

“मातीच्या गोळ्यांना रूप देणारे आणि निस्तेज ताऱ्यांना चमकदार बनवणाऱ्या गुरूंच्या टीमवर आम्हाला गर्व आहे.”